... तर स्वतःची पेन्शन द्यायला तयार : भरत गोगावले

… तर स्वतःची पेन्शन द्यायला तयार : भरत गोगावले

| Updated on: Mar 15, 2023 | 2:41 PM

संपातील कर्मचारी यांनी आमदारांनी त्यांची पेन्शन सोडावी असं म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे.

मुंबई : जुनी पेन्शन योजना लागू हवी याकरता कालपासून राज्य सरकारी कर्मचारी आणि निम्म सरकारी कर्मचारी संपावर आहेत. तसेच संपातील कर्मचारी यांनी आमदारांनी त्यांची पेन्शन सोडावी असं म्हटलं आहे. त्यावर शिवसेनेचे नेते आमदार भरत गोगावले यांनी भाष्य केलं आहे. गोगावले यांनी, जर राज्याचा आणि या कर्मचाऱ्यांचं हित त्यातच असेल तर आम्ही आमची पेन्शन सोडायला तयार आहोत. आम्ही आमदार जेव्हा रिटायर होतो. तेव्हा ही पेन्शन येते. पण जर राज्याच्या हितासाठी भल्यासाठी, आमच्या पेन्शनमुळे अडचण येत असेल, तर आम्ही पेन्शन बंद करायला सांगतो. कर्मचाऱ्यांचे समाधान होणार असेल तर आमची पेन्शन द्यायला तयार आहोत. तर स्वतःची पेन्शन सरकारला द्यायला तयार आहे.

Published on: Mar 15, 2023 02:41 PM