जुन्या पेन्शन योजनेबाबत शिंदे-फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक संपन्न; काय निर्णय? पाहा…
जुन्या पेन्शन योजनेसाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येतंय. जिल्हा परिषद,निम सरकारी, महसूल, राज्य सरकारी, महानगरपालिका यासह शासनातील सुमारे 32 विभागाचे कर्मचारी आज संपावर आहेत. पुणे जिल्ह्यातील 68 हजार कर्मचारी संपावर आहेत.
मुंबई : जुनी पेन्शन योजनेसाठी ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. कर्मचाऱ्यांकडून ही जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेदेखील उपस्थितीत होते. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात तातडीने निर्णय घेण्यात येणार नाही. तर या पेन्शन योजनेसाठी सरकारच्या वतीने समिती नेमण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगरमध्येही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. जुनी पेन्शन योजना आणि ग्रेड पेसाठी हे आंदोलन केलं गेलं.
Published on: Mar 13, 2023 02:58 PM
Latest Videos