जुन्या पेन्शनबाबत त्रिसदस्यीय समितीची स्थापना, तीन महिन्यात अहवाल

जुन्या पेन्शनबाबत त्रिसदस्यीय समितीची स्थापना, तीन महिन्यात अहवाल

| Updated on: Mar 15, 2023 | 9:35 AM

जुन्या पेन्शनसाठी होणारे आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे

मुंबई : जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातील 18 लाख कर्मचारी कालपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम शासकीय कामांसह आरोग्य व्यवस्थेवर पडला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यांवर तोडगा निघावा अशी सामान्यापासून राजकीय नेत्यांवरपर्यंत सगळ्यांचीच भावना आहे. जुन्या पेन्शनसाठी होणारे आंदोलने लक्षात घेऊन राज्य सरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तर ही समिती तीन महिन्यांमध्ये अहवाल देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या समितीत निवृत्त सनदी अधिकारी सुबोध कुमार, के बी बक्षी आणि सुधीर कुमार श्रीवास्तव या समितीमध्ये असणार आहेत. ही समिती राष्ट्रीय निवृत्ती योजना आणि जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून शिफारस अहवाल शासनास तीन महिन्यात देतील असेही मुख्यमंत्री म्हणाले.