वाशिममध्ये चित्तथरारक घटना, रस्त्यालगतची इमारत अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली

| Updated on: Aug 08, 2023 | 7:33 AM

VIDEO | वाशिम जिल्ह्यात दोन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, कोसळतानाचा थरारक व्हिडीओ तुम्हाला विचलित करु शकतो...

वाशिम, ८ ऑगस्ट २०२३ | वाशिम जिल्ह्यात सोमवारी जुनी असलेली दोन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याचे पाहायला मिळाले. इमारत कोसळल्याची घटना अतिशय भयानक होती. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तर या इमारतीत कुणी वास्तव्यास असतं तर मोठी हानी झाली असती, अशा प्रकारे ही इमारत कोसळली. अवघ्या दहा सेकंदात या इमारतीचं होत्याचं नव्हतं झाल्याचं पाहायला मिळालं. वाशिमच्या मालेगाव शहरातील मुख्य शिव चौकातील एक जुनी झालेली दुमजली इमारत आज अचानक कोसळली. सुदैवाने या रहदारीच्या रस्त्यावर इमारत कोसळत असताना वाहने नसल्याने आणि इमारतीमध्ये कोणीही राहत नसल्यामुळे यात कुठली जीवितहानी झाली नाही. मात्र इमारतीला लागून असलेली पानपट्टीवर इमारतीचा ढिगारा कोसळला. त्यामुळे नुकसान झालंय. संबंधित घटनेनंतर तातडीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचा ढिगारा रस्त्यावरुन हटवण्याचं काम सुरू केलं.

Published on: Aug 08, 2023 07:30 AM
खासगी कंपन्यांकडून MPSC विद्यार्थ्यांची लूट? राष्ट्रवादीच्या नेत्याची आगपाखड
गीता जैन यांना पुन्हा राग अनावर; आधी अभियंताच्या कानशीलात आणि आता थिएटरमध्ये…पाहा काय झालं?