राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, २२ आमदार फुटणार ? कोणी केला हा दावा ?

राज्यात पुन्हा राजकीय भूकंप, २२ आमदार फुटणार ? कोणी केला हा दावा ?

| Updated on: Feb 12, 2023 | 8:04 AM

बच्चू कडू हे आमचे सिनियर लीडर आहेत. त्यांच्याकडे अशी यादी आल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांच्याकडे १० ते १२ जणांची यादी आहे.

मुंबई : माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी १० ते १२ आमदार त्यांचा पक्ष सोडणार आहेत. ते शिंदे गटात किंवा भाजपमध्ये प्रवेश करतील असे विधान केले होते. त्यापाठोपाठ शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनीही महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सरकार उद्योगपतींची काळजी घेत आहे. अशी टीका केली होती. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, आज राजकीय कुस्तीमध्ये शिंदे साहेबांनी त्यांना सहा महिन्यांपूर्वी कसे चितपट केले ते पण पाहिलेच आहे. तसेच, बच्चू कडू हे आमचे सिनियर लीडर आहेत. त्यांच्याकडे अशी यादी आल्याशिवाय ते बोलणार नाहीत. त्यांच्याकडे १० ते १२ जणांची यादी आहे. तर माझ्याही संपर्कात १० आमदार आहेत. त्यांची यादी वेगळी आणि माझी यादी वेगळी आहे. त्यामुळे एकूण २० ते २२ आमदार आमच्यासोबत येतील, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

Published on: Feb 12, 2023 08:04 AM