बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजीपार्क सजले, पहा हा खास व्हिडिओ..
बाळासाहेब यांच्या दर्शनासाठी सकाळपासून महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांची रांग लागली आहे.
मुंबई : हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाळासाहेब यांच्या दर्शनासाठी सकाळपासून महाराष्ट्रातून आलेल्या शिवसैनिकांची रांग लागली आहे. संपूर्ण परिसर फुलांनी सजवला आहे.
ठाकरे गटामध्ये फूट पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी मोठया प्रमाणात शिवसैनिक येथे येण्याची शक्यता आहे. संभाजीनगर येथील शिवसैनिक शिवाजीपार्क येथील स्मृतीस्थळावर दाखल झाले असून आमचा गट आणि पक्ष हा एकच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. उद्धव ठाकरे आणि आदित्य यांची शिवसेना अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Published on: Jan 23, 2023 08:26 AM
Latest Videos