Pune NCP Holi | राष्ट्रवादीच्या शहर कार्यालयाच्या प्रांगणात होळीचं आयोजन
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहर कार्यालयाच्या प्रांगणात होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महागाई आणि बेरोजगारीची होळी करत तिचे दहन करण्यात आलं
पुणे : वाढती महागाई विरोधात सध्या जोरदार चर्चा होऊ लागली आहे. नुकताच तीन राज्यांच्या निवडणूका आणि पुण्यातील दोन जागांच्या पोटनिवडणूका पार पडल्या. तीन राज्यांत कमळ फुलले मात्र त्यानंतर लगेच महागाईचा भडका उडाला. घरगुती गॅस ५० रूपयांनी महाग झाल्याने सर्वसामान्यांच्या फिशाला चांगलीच कात्री लागली आहे. तर गृहणींचे बजेट बिघडले आहे. यावरून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शहर कार्यालयाच्या प्रांगणात होळीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महागाई आणि बेरोजगारीची होळी करत तिचे दहन करण्यात आलं
Published on: Mar 06, 2023 06:55 PM
Latest Videos