पुतण्याच्या लग्नात आमदार राजकुमार पटेलांच्या कमरेला ढोलकी, आदिवासी नृत्यावर धरला ठेका
अनेकदा आमदार, खासदार आणि मंत्र्याचे (minister) व्हिडीओ व्हायरल (viral video) झाल्याचे आपण पाहिले आहेत, ते अनेक वेगळ्या कारणाने व्हायरल होत असतात, कारण एखादं कृत्य केल्यानंतर ते किती लोकप्रिय आहेत.
अमरावती – अनेकदा आमदार, खासदार आणि मंत्र्याचे (minister) व्हिडीओ व्हायरल (viral video) झाल्याचे आपण पाहिले आहेत, ते अनेक वेगळ्या कारणाने व्हायरल होत असतात, कारण एखादं कृत्य केल्यानंतर ते किती लोकप्रिय आहेत. त्यावर त्या व्हिडीओ मर्यादा ठरते. कारण आमदाराचे आणि खासदाराचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्याचे पाहिले आहेत. तसेच अनेकांनी माफी देखील मागितल्याचे पाहिले त्यामुळे एखादी गोष्ट करताना काळजी घ्यावी लागते. पुतण्याच्या लग्न समारंभात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल (rajkumar patel) यांनी कमरेला ढोलकी बांधून आदिवासी नृत्यावर ठेका धरल्याने त्यांचा व्हिडीओ अमरावतीतील (amravati) त्यांच्या मतदार संघात त्याच्या लोकप्रियतेमुळे अनेक चाहत्यांच्या सोशल मीडियावर फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे त्यांची त्यांच्या मतदारसंघात किती पकड आहे दे यावरून दिसून येते. अनेकदा घरच्या कार्यक्रमात डान्स केल्यानंतर सेलिब्रिटी आणि नेत्यांचे फोटो व्हायरल होतात. कारण त्यांचा चाहतावर्ग मोठा असतो.