दिवाळी तोंडावर पण मंत्री दीपक केसरकर यांनी आधीच मोठा बॉम्ब फोडला, पाहा काय म्हणाले?
स्वछता मेंटेन करताना काही कठोर पावले उचलावी लागतील. अनधिकृत बांधकाम असेल तर त्यावर कारवाई केलीच जाईल. मुंबईत ट्राफिक मोठ्या प्रमाणात होत आहे त्यासाठी मुंबई IIT ची मदत घेऊन आर्टिफिशियल इन्टीलेजन्सचा वापर करून ट्राफिकवर उपाय करणार आहोत आता तात्पुरत्या स्वरूपात हे सुरु करणार आहोत असे मंत्री केसरकर म्हणाले.
मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मुंबईतील प्रदूषण प्रचंड प्रमाणात वाढलंय. मुंबईच्या हवेत जे धुलिकण येत आहेत ते ठिकठिकाणी काम सुरु आहे त्यामुळे येत आहेत. जास्त प्रदूषण होऊ नये यासाठी उपाययोजना केल्या आहेत. बांधकाम सुरु असतील तिथे मोठे पत्रे लावणे, फॉगिंग गन्स वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. शिवाजी पार्क, राणीची बाग येथे फॉग स्प्रिंकल मशीन बसवल्या जाणार आहेत. बऱ्याच बेकऱ्या आहेत तिथे प्लायवूड जाळून धुर केला जातो. त्यावर उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईच्या मार्केटमधील काही बदल करायचे असून त्याचा कायापालट करायचा ठरवलं आहे. गिरगांव चौपाटी येथे स्वराज भूमी म्हणून ओळखलं जातं. पण, जास्त कोणाला माहित नाही म्हणून तिथे आम्ही गेट करणार आहोत. मुंबईत स्वछता मेंटेन करताना काही कठोर पावले उचलावी लागतील. दिल्लीमध्ये फटाक्यावर बंदी आहे. पण, मुंबईत फटाके बंद करण्यापेक्षा ते कमी वापरा. दिवाळीमध्ये फटाक्याचा वापर कमी करावा असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.