साताऱ्यात गणेश देखाव्यातून भारतीय सैनिकांना सलाम
सासवडे आणि घाडगे कुटुंबीयांनी हा सुंदर देखावा सादर केल्याने अनेक गणेश भक्तांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. हा देखावा तयार होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला असून दोन्ही कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्यांनी भारतीय सैनिकांचे देशासाठी योगदान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्याबद्दल आणि देशाच्या अमृत महोत्सवी वर्षाबद्दल साताऱ्यातीलल सासवडे आणि घाडगे कुटुंबीयांनी मिळून गणरायाच्या देखाव्यामध्ये भारताचा नकाशा साकारला आहे. त्यामध्ये भारतीय सैनिकांचा गौरव करत त्यांच्या कार्यपद्धतीही दाखवण्यात आली आहे. देशातील विविध भागात भारतीय सैनिक कसे राहतात, ते राहत असलेल्या भागातील वातावरण, त्यांचे कामाचे स्वरुप या सगळ्या गोष्टींना त्यांनी देखाव्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सासवडे आणि घाडगे कुटुंबीयांनी हा सुंदर देखावा सादर केल्याने अनेक गणेश भक्तांनी देखावा पाहण्यासाठी गर्दी केली आहे. हा देखावा तयार होण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागला असून दोन्ही कुटुंबीयांतील प्रत्येक सदस्यांनी भारतीय सैनिकांचे देशासाठी योगदान दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
Published on: Sep 05, 2022 01:47 PM
Latest Videos