पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; सरकारी हॉस्पीटलमध्ये जन्मलेल्या बाळांना दिली सोन्याची अंगठी भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस; सरकारी हॉस्पीटलमध्ये जन्मलेल्या बाळांना दिली सोन्याची अंगठी भेट

| Updated on: Sep 17, 2022 | 11:52 PM

30 मुला मुलींना ही सोन्याची अंगठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून देण्यात आली आहे.

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या(Prime Minister Narendra Modi’s birthday) निमित्ताने शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना सोन्याची अंगठी वाटप करण्यात आली आहे. भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(MP Dhananjay Mahadik) यांच्या वतीने आज रुग्णालयात जन्माला आलेल्या बाळांना सोन्याची अंगठी प्रदान करण्यात आली. मोदी यांचा वाढदिवस कोल्हापुरात आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. काल रात्री बारा वाजल्यापासून आज रात्री बारा वाजेपर्यंत जी मुलं मुली जन्माला येणार आहेत त्यांना ही अंगठी देण्यात आली. साधारण 30 मुला मुलींना ही सोन्याची अंगठी खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून देण्यात आली आहे. कदाचित कोल्हापुरातच अशा पद्धतीने मोदींचा वाढदिवस साजरा झाला असणार.

Published on: Sep 17, 2022 11:52 PM