राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा पत्ता नाही तोच कोठे लागले भावी पालकमंत्रीचे बॅनर
राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार झालेला नाही लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या विस्तारा व्हावा अशी भावना शिंदे गटातील अनेक आमदारांची आहे. तर अनेक आमदार गुडघ्याला मंत्रिपदाचे बाशिंग बांधून तयार आहेत.
भंडारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागात महाविकास आघाडितील विविध नेत्यांचे भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. त्यावरून भाजपकडून सडकून टीका झाली आहे. तर मविआत 10 एक मुख्यमंत्री असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे. याचदरम्यान आता राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार झालेला नाही लवकरात लवकर मंत्रिमंडळाच्या विस्तारा व्हावा अशी भावना शिंदे गटातील अनेक आमदारांची आहे. तर अनेक आमदार गुडघ्याला मंत्रिपदाचे बाशिंग बांधून तयार आहेत. त्यातच आता शिंदे गटातील भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवसाच्या निमित्त भावी पालकमंत्री भंडारा असे शहरात बॅनर झळकले आहेत. या आधीही नाना पटोले यांचे भंडारा शहरात वाढदिवसाच्या दिवशी भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले होते. तर आता भोंडेकर यांचे बॅनर लागल्याने पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झालेला आहे.