पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र, काय होतं निमित्त? एकत्र होते मात्र दुरावा कायम
tv9 Marathi Special Report | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार यांच्या वडिलांच्या नावानं असलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उद्धाटनाचं निमित्त होतं. एकत्र आले मात्र राजकीय दुरावा कायम
मुंबई, २३ ऑक्टोबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. निमित्त होतं ते म्हणजे अजित पवार यांच्या वडिलांच्या नावानं असलेल्या अनंतराव पवार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या उद्धाटनाचं… या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी अजित पवार आणि शरद पवार हे एकाच मंचावर आले होते. मात्र एकत्र आले असताना त्या दोघांमधील राजकीय दुरावा मात्र स्पष्टपणे दिसत होता. साधारण दीड तास एकत्र असले तरी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात कोणताही संवाद झाला नाही. दौंड तालुक्यातील चिंचोली येथे अजित पवार यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या इंग्रजी मिडीयम स्कूलच्या वास्तूचं उद्धाटन होतं. याच सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंब हजर होतं. फित कापून या वास्तूच्या उद्धाटन सोहळ्याची सुरूवात शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे देखील हजर होत्या. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट