Maharash Politics । शरद पवार की अजित पवार ? सांगलीतील राष्ट्रवादीच्या आमदार, पदाधिकाऱ्यांची भूमिका काय?
अजित पवार यांच्यासह काही आमदारांच्या बंडाळीमुळे राज्यभरात राष्ट्रवादीत दुफळी दिसून येत आहे. मात्र सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या मागेच ठामपणे उभी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमदार यानी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केले आहे.
सांगली: अजित पवार यांच्यासह काही आमदारांच्या बंडाळीमुळे राज्यभरात राष्ट्रवादीत दुफळी दिसून येत आहे. मात्र सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी ही शरद पवारांच्या मागेच ठामपणे उभी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी आणि आमदार यानी आपण शरद पवारांसोबतच असल्याचे जाहीर केले आहे. सोमवारी राष्ट्रवादी कार्यालयात आयोजित पत्रकार बैठकीत तासगावच्या आमदार सुमनताई पाटील, शिराळ्याचे आमदार मानसिंगराव नाईक, आणि विधानपरिषद आमदार अरुण लाड यांनी उपस्थिती लावत सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादी ही जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या मागेच ठामपणे असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. या पदाधिकाऱ्यांनी नेमकी काय भूमिका मांडली यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा…
Published on: Jul 04, 2023 09:56 AM
Latest Videos