झाड अंगावर कोसळून एक ठार, एक गंभीर जखमी

झाड अंगावर कोसळून एक ठार, एक गंभीर जखमी

| Updated on: Jun 15, 2022 | 10:01 AM

झाड अंगावर कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. चाकण - तळेगाव मार्गावर ही घटना घडली.

पुणे: जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंगावर झाड पडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. चाकण – तळेगाव मार्गावरील ही घटना आहे. अंगावर झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला. अलिकडच्या काळात झाडं कोसळून अनेक दुर्घटना घडतात, मात्र याकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांच्या वतीने करण्यात आला आहे.