कोकणवासियांसाठी महत्वाची बातमी! कशेडी घाट भुयारी मार्गातील एक मार्गिका खुली; पहा कोणाला जाता येणार?
यादरम्यान कोकणवासियांसाठी एक महत्तवाची बातमी असून आता कोकणवासियांना याच घाटातून कोकणात जाता येणार आहे. त्यामुळे कोकणवासियांचा अमुल्य वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. कशेडी घाटातील भुयारी मार्गातील एक मार्गिका फक्त हलक्या वाहनांसाठी खुला करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदा निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. यादरम्यान कोकणवासियांसाठी एक महत्तवाची बातमी असून आता कोकणवासियांना याच घाटातून कोकणात जाता येणार आहे. त्यामुळे कोकणवासियांचा अमुल्य वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे. कशेडी घाटातील भुयारी मार्गातील एक मार्गिका फक्त हलक्या वाहनांसाठी 15 जूनपर्यंत खुला करणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने आखून दिलेल्या सुरक्षा योजनांची चाचणी केल्यानंतर कशेडी भुयारी मार्गातील एक मार्गिका खुली करण्याचे प्रयोजन असल्याचे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. याशिवाय कशेडी घाटातून जाणारे दोन्ही भुयारी मार्ग डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तब्बल 1800 मीटर लांब असलेल्या या भुयारी मार्गामुळे वाहन चालकांच्या 45 मिनिटांची बचत होईल, असा दावा मंत्री चव्हाण यांनी केला आहे.