गाडी वांद्रे-वरळी सी लिंकवर पार्क करून एकाने थेट मारली समुद्रात उडी; वरळी पोलीसांनी घटनास्थळी धाव
त्याने आपली गाडी सी लिंकवरच पार्क करत थेट समुद्रात उडी मारली. सध्या त्याचा शोध हेलिकॉप्टरने घेतला जात आहे. तर अद्यापही त्याच्या आत्महत्येमागिल कारण समजू शकलेले नाही.
मुंबई, 31 जुलै 2023 | येथील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने आपली गाडी सी लिंकवरच पार्क करत थेट समुद्रात उडी मारली. सध्या त्याचा शोध हेलिकॉप्टरने घेतला जात आहे. तर अद्यापही त्याच्या आत्महत्येमागिल कारण समजू शकलेले नाही. मिळालेल्या प्रथमिक माहितीनुसार वांद्रे-वरळी सी लिंकवरून उडी मारणाऱ्या व्यक्तिचे नाव दीपक खूपचंदानी असे असून तो खारचा रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे. तर त्याने उडी मारल्याची माहिती मिळताच वरळी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत शोध घेण्यासाठी नौसेनेला पाचारण केले. त्यानंतर आता हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध घेतला जात आहे.
Published on: Jul 31, 2023 01:59 PM
Latest Videos