पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी? नीरा देवघर धरणात राहिला ”इतकाच” पाणीसाठा
मान्सूनने अजूनही राज्यात पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे हे संकंट अधीक गडद होणार की काय अशी शंका अनेकांना आहे. जर लवकर पाऊस सुरू झाला नाही तर अेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अशीच परिस्थिती पुण्यातील भोर तालुक्यात येण्याची शक्यता आहे.
पुणे : सध्या राज्याच्या अनेक भांगाना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच मान्सूनने अजूनही राज्यात पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे हे संकंट अधीक गडद होणार की काय अशी शंका अनेकांना आहे. जर लवकर पाऊस सुरू झाला नाही तर अेकांना पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे. अशीच परिस्थिती पुण्यातील भोर तालुक्यात येण्याची शक्यता आहे. येथील नीरा देवघर धरणाच्या पाणी साठ्यान तळ घाटलाय. धरणात केवळ 17 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर, फलटण या तालुक्यातील गावांना धरणामधून पाणी पुरवठा होत असतो. या भागातील शेतीसाठी धरणामधून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आल्यानं हा पाणीसाठा झपाट्याने कमी झालाय. पाऊस वेळेवर दाखलं न झाल्यास, या धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या तालुक्यांमध्ये पाणी टंचाईचं संकट ओढवू शकते.
Published on: Jun 06, 2023 09:05 AM
Latest Videos