Special Report | रहेगीं तो सिर्फ BJP; शिवसेना आता संपण्याच्या उंबरठ्यावर – जेपी नड्डांचं विधान वादात
जे.पी.नड्डांच्या या विधानामुळे शिंदे गटाची कोंडी झालीय. कारण शिंदे गटातले जवळपास सर्वच नेते आम्हीच आता खरी शिवसेना असल्याचं म्हणतायत आणि भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डांच्या दाव्यानुसार शिवसेना आता संपण्याच्या उंबरठ्यावर आलीय.
मुंबई : एकनाथ शिंदे गट(Eknaath shinde) म्हणतोय की आता आम्हीच शिवसेना(shivsena) आहोत. काही भाजप नेते सुद्धा शिंदे गटाला शिवसेना म्हणतायत. मात्र, भाजपचेच राष्ट्रीय अध्यक्षांच्या दाव्यानुसार शिवसेना आता संपण्याच्या उंबरठ्यावर आहे. विशेष म्हणजे भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डांनी(JP Nadda) हे विधान त्या बिहारमध्ये केलंय. जिथं भाजप नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलासोबत सत्तेत आहे. जे.पी.नड्डांच्या मते इतर सर्व पक्ष संपले आहेत आणि जे सध्या अस्तित्वात आहेत. ते सुद्धा आगामी काळात संपतील आणि भविष्यात फक्त भाजपच शिल्लक राहिल. थोडक्यात भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही., असं जे.पी.नड्डांचं म्हणणं आहे. मात्र मागच्या काही वर्षात घराणेशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या पक्षातूनच भाजपनं नेते आयात केले. आणि त्यांच्या मुला-बाळांना खासदार-आमदार होण्याचीही संधी दिलीय. जे.पी.नड्डांच्या या विधानामुळे शिंदे गटाची कोंडी झालीय. कारण शिंदे गटातले जवळपास सर्वच नेते आम्हीच आता खरी शिवसेना असल्याचं म्हणतायत आणि भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डांच्या दाव्यानुसार शिवसेना आता संपण्याच्या उंबरठ्यावर आलीय.