निर्णय गतिमान जाहिरातबाजी आणि आनंदाचा शिधावरून अजित पवारांची टोलेबाजी
अजित पवार यांनी सरकारवर टीका करताना, या सरकारचा एकच धंदा सुरू आहे. निर्णय वेगवान सरकार गतिमान. काय केलं? ते सांगा
जालना : राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी जालना येथे निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान या जाहिरातीवरून शिंदे-फडणवीस सरकारला चांगलेच धारेवर धरलं. तसेच भविष्यातील पराभवाच्या भीतीनेच सरकारकडून ही जाहिरातबाजी केली जात असल्याची टीका केली. तसेच अजित पवार यांनी सरकारवर टीका करताना, या सरकारचा एकच धंदा सुरू आहे. निर्णय वेगवान सरकार गतिमान. काय केलं? ते सांगा. शेतकऱ्याबद्दल बोलताना तुमची दातखील बसते का? असा सवाल देखील त्यांनी केला. त्याचबरोबर हे सरकार तोडफोड करून आणलेलं आहे. जे लोकांना मान्य नाही. तसेच यावेळी अजित पवार यांनी आनंदाचा शिधा वरून सरकार टीका केली. आनंदाचा शिधातील मिळणाऱ्या4 किलोत काय होतय काय माहित. तुमचं कुटुंब चावून दाखवा.
Published on: Mar 26, 2023 02:53 PM
Latest Videos