मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील, मात्र सध्या आपल्यासमोर… बावनकुळे यांना काय सांगायचय?
प्रत्येक बुथवर 25 पक्षप्रवेश तर या महिन्यात 25 लक्ष कार्यकर्त्याचा प्रवेश या महिन्यात करण्याचे उद्देश आसल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश ठरला आहे. याही मंगळवारी एका मोठ्या पक्षाचा प्रवेश आहे
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राज्यातील राजकारण तापलं होतं. यानंतर थेट अजित पवार यांनीच समोर येत ही कोंडी फोडली आणि आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केलं. त्यानंतर या प्रश्नाला फुलस्टॉप लागलेला असतानाच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवा सस्पेन्स निर्माण केला आहे. त्यांनी सध्या मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील, मात्र सध्या आपल्यासमोर… असे म्हटल्याचे अनेकांच्या भूवया पुन्हा उंचावल्या आहेत. त्यांनी प्रत्येक बुथवर 25 पक्षप्रवेश तर या महिन्यात 25 लक्ष कार्यकर्त्याचा प्रवेश या महिन्यात करण्याचे उद्देश आसल्याचे सांगितले. तसेच प्रत्येक मंगळवारी भाजप पक्षात प्रवेश ठरला आहे. याही मंगळवारी एका मोठ्या पक्षाचा प्रवेश आहे. मोठ्या नेत्यांचे पक्षप्रवेश आश्चर्यचकित करणारे असतील. पण आता सध्या माझ्यासमोरचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे म्हटलं आहे.