Special Report | मुख्यमंत्री बदलाचे वारे सासुरवाडीपर्यंत, अजित पवार यांच्या 'त्या' पोस्टर्समुळे चर्चांना उधान

Special Report | मुख्यमंत्री बदलाचे वारे सासुरवाडीपर्यंत, अजित पवार यांच्या ‘त्या’ पोस्टर्समुळे चर्चांना उधान

| Updated on: Apr 26, 2023 | 7:02 AM

गेल्या काही दिवसात अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. त्याला अजित पवार यांनीच ब्रेक लावला. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत त्यांनीच आताच मुख्यमंत्री पदावर दावा सांगेल असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. आधी भाजप प्रवेशावरून आता एका पोस्टर्समुळे. अजित पवार यांच्या सासूरवाडीतच त्यांचे भावी मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणून पोस्टर्स झळकल्याने आता नव्या चर्चांना उधान आलं आहे. याचदरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे देखील भावी मुख्यमंत्री असे बॅनर नागपुरात झळकले आहे. त्यावरून राज्यात खमंग चर्चा होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात अजित पवार हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती. त्याला अजित पवार यांनीच ब्रेक लावला. मात्र त्यानंतर एका मुलाखतीत त्यांनीच आताच मुख्यमंत्री पदावर दावा सांगेल असे म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. धाराशिव जिल्ह्यातील ‘तेर’ गाव हे अजित पवार यांची सासुरवाडी आहे. तिथे अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा आशयाचे पोस्टर झळकलेत. तेर गावातील चौकाचौकात ‘तेरचे जावई, आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार, असे पोस्टर दिसू लागले आहेत.

Published on: Apr 26, 2023 07:02 AM