Video | दुसऱ्या प्रकल्पाचं गाजर नको, वेदांताच महाराष्ट्रात आणा, विरोधी पक्ष नेते अजित पवारांची मागणी

| Updated on: Sep 15, 2022 | 10:14 AM

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव इथं होणार होता. दीड लाख कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारला विरोधी पक्षांनी चहुबाजूंनी घेरलंय.

मुंबईः राज्यातील जनतेला दुसऱ्या प्रकल्पाचं गाजर नका दाखवू, वेदांता प्रकल्पच महाराष्ट्रात आणा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली आहे. संधी ही पहिल्यांदाच मिळत असते, तिचं सोनं केलं पाहिजे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी इतर कोणतीही आश्वासनं न देता, वेदांता प्रकल्पच (Vedanta Project) महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असं वक्तव्य अजित पवार यांनी नुकतंच केलंय. तसंच नाणार प्रकल्पाला शिवसेना नेत्यांचा विरोध नाहीये, तर स्थानिकांचा विरोध आहे, असा आरोपही अजित पवार यांनी केलाय. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातील तळेगाव इथं होणार होता. दीड लाख कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प गुजरातमध्ये जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. त्यावरून एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारला विरोधी पक्षांनी चहुबाजूंनी घेरलंय.

Published on: Sep 15, 2022 10:14 AM