जाहिरातीमधील ‘त्या’ फोटोंवरून अजित पवार यांचा पारा चढला, म्हणाले, ‘9 लोकांचा उधो उधो…’
विरोधकांसह आता भाजपकडून खुली नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार अनिल बोंडे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. याच नव्या जाहिरीतीवरून आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच संतप्त सवाल केला आहे.
मुंबई : शिंदे गटाच्या नव्या जाहिरातीवरून सध्या राजकारण चांगलच तापलेलं आहे. यावरून विरोधकांसह आता भाजपकडून खुली नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार अनिल बोंडे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. याच नव्या जाहिरीतीवरून आता विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच संतप्त सवाल केला आहे.
आजच्या छापून आलेल्या आजच्या जाहिरातीत शिंदे गटाने बाळासाहेब ठाकरे, दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिंदे गटातील 9 मंत्र्यांचे फोटो छापले आहेत. हे सगळं फक्त डॅमॅजे कंट्रोल करण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता 9 मंत्र्यांचे फोटोवरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत.
तर अजित पवार यांनी शिवसेनेच्या 9 मंत्र्यांची माळ लावली असं म्हणत टीका केली आहे. त्याचबरोबर भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का टाकले नाहीत? असा सवाल करत 9 मंत्र्यांपैकी 5 मंत्री हे वादग्रस्त आहेत. यांच्याविरोधात माध्यमातून सातत्यानं बातम्या सुरु आहेत. मग अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरुण घालण्याचा प्रयत्न शिंदे करत आहेत का असा संतप्त सवाल पवारांनी विचारला आहे.