प्रकाश आंबेडकर औरंगजेबच्या कबरीवर का गेले? अजित पवार म्हणतात….
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून भाजपसह महाविकास आघाडील नेत्यांनी आंबेडकर यांच्या याकृतीवर प्रश्न उठवले आहे. यावरूनच भाजपने देखील उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे.
पुणे : काही दिवसांपासून राज्यातील राजकारण हे औरंगाजेबाचे स्टेटसवरून चांगलेच तापलेलं आहे. तर यावरून राज्यात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाजेबाच्या कबरीला भेट दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरून भाजपसह महाविकास आघाडील नेत्यांनी आंबेडकर यांच्या याकृतीवर प्रश्न उठवले आहे. यावरूनच भाजपने देखील उद्धव ठाकरे यांनी लक्ष केलं आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न केला. त्यावर प्रतिक्रिया देताना, त्यांनी, प्रकाश आंबेडकर साहेब सीनियर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातल्या आहेत. माजी खासदार आहेत. वंचित आघाडीचे नेते आहेत. लोकशाहीमध्ये संविधानाने जसा आपल्याला अधिकार दिला आहे. तसाच तो त्यांना दिलेला आहे. परंतु शिवप्रेमींना हे आवडलेलं नाही. तर ते तिथं कशाकरता गेले, त्यांच्या मनामध्ये काय आहे यावर तेच जास्त अधिकार वाणीने नक्कीच सांगू शकतील असंही अजित पवार म्हणाले.