…तेव्हा तुम्ही सोबत काय करत होते? अंबादास दानवे यांचा आशिष शेलार यांच्यावर पलटवार
वायफळ गप्पा न करता मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा, त्यानंतर बघू जनता तुम्हाला निवडून देते की आम्हाला? आंबादास दानवे यांचे भाजपला खुलं आव्हान
मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर दरोडा टाकला आणि हा दरोडा टाकण्याचे काम उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे दरोडा टाकत होते तर त्यांच्यासोबत तुम्ही इकेत वर्ष का होता? तुम्ही मुंबई महापालिकेच्या सत्तेत सहभागी होता, उपमहापौर तुमचा होता, कित्येक समित्यांचे सभापती तुमचे होते मग तुम्ही महाराष्ट्रासह देशावर दरोडा टाकताय असं आम्ही म्हणायचं का? असा प्रतिसवाल भाजपला अंबादास दानवे यांच्याकडून विचारण्यात आला आहे.
वायफळ गप्पा न करता मुंबई महापालिकेच्या निवडणुका जाहीर करा, त्यानंतर बघू जनता तुम्हाला निवडून देते की आम्हाला, असा सल्लाही अंबादास दानवे यांनी भाजपला सुचवला आहे. जी-२० च्या निमित्ताने मुंबई महापालिकेकडून कोणते खर्च करण्यात आले हे सांगावं. एक ध्वज २४ हजार रूपयांना खरेदी केला हा दरोडा नाही का? अशी टीका करत भाजपला प्रतिसवाल अंबादास दानवे यांच्याकडून विचारण्यात आला आहे.