हिंदू जिवंत असेपर्यंत शिवसेना…, अंबादास दानवेंचा राणांवर पलटवार
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर आमदार रवी राणा यांनी अमरावतीत मोठं विधान केलं आहे. यांच्या या विधानावरून आता चांगलेच राजकारण तापलं आहे.
मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षानंतर उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शिंदे गट, भाजप आणि त्यांच्यासोबत असलेले मित्र पक्ष पुढे सरसावले आहेत. दोन्ही गट एकमेकांवर आपोर-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यात अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा याही मागे नाहीत.
आमदार रवी राणा यांनी अमरावतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर मोठं विधान केलं आहे. आमदार राणा यांनी ठाकरे गटात केवळ तीनच सैनिक राहणार, त्यांच्या शिवसेनेत आता कोणच उरणार नाही. त्यांची शिवसेना आता पुर्णपणे संपलेली आहे, असे म्हटलं होतं. त्यावर विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी रवी राणा यांना उत्तर दिलं आहे.
अंबादास दानवे यांनी रवी राणा यांना उत्तर देताना, जोपर्यंत हा महाराष्ट्र आहे. या राज्यात मराठी, हिंदू जीवंत आहे तोपर्यंत उद्धव ठाकरे यांची शिवसेना असणार. तर आपली राणा यांना इतकीच विनंती आहे की, बच्चू कडू तुमच्यावर काय काय आरोप करतात, आपल्या शिक्षण संस्थाबाबत काय आरोप करतात त्यावर बोलावं. अजून आम्ही त्यावर काही बोलत नाही. तुम्ही राज्याच्या या विषयात पडण्याची गरज नाही.