Aurangzeb Tomb : औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा
Ambadas Danve Tweet On Aurangzeb Tomb Security : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असल्याने सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सरकारने कडेकोट बंदोबस्त या कबरीच्या परिसरात लावला आहे. त्यावरून अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या सुरक्षेवरून शिवसेना विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केली आहे. यासंदर्भात आपल्या एक्स आकाऊंटवरून ट्विट शेअर करत अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.
छत्रपतींचा आशीर्वाद अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी शंभूराजांच्या मारेकऱ्याच्या कबरी भोवती किल्लाच उभा केला आहे. याउपर तीन फूटी तार येणार आहे. आता फक्त लष्कर लावायचं बाकी राहिलं आहे, अशी टीका ट्विटमधून दानवे यांनी केली आहे.
Published on: Mar 21, 2025 01:36 PM
Latest Videos

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा

केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी

बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं

आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
