14 टि्वटस मध्ये Fadnavis काय म्हणाले ?

| Updated on: Apr 14, 2022 | 7:13 PM

राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत प्रबोधनकार ठाकरेच आपले आदर्श असल्याचा टोला लगावलाय. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याची सभा आणि ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शरद पवार हे नास्तिक आहेत, ते क्वचितच एखाद्या मंदिरात दिसतील असं वक्तव्य राज यांनी केलं. इतकंच नाही तर शरद पवार यांनीच राज्यात जातीवादाचं विष पसरवल्याचा गंभीर आरोपही राज यांनी केला. राज ठाकरेंच्या आरोपांना शरद पवार यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत प्रबोधनकार ठाकरेच आपले आदर्श असल्याचा टोला लगावलाय. दरम्यान, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या वादात आता भाजपनं उडी घेतलीय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एकापाठोपाठ एक 14 ट्वीट करत शरद पवार यांच्यावर प्रश्नांची सरबत्तीच केलीय.