Special Report | सत्ता संघार्षाच्या निकाला आधीच राज्यात वादळ; अजित पवार पुन्हा भाजपच्या वाटेवर? पडद्यामागंच राजकारण काय?
याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे म्हटलं होतं. त्यातच सत्ताधारी शिंदे गटाचे दादा भूसे यांनी देखिल ते अस्वस्थ असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे
मुंबई : काही दिवसांपासून राज्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार हे नाराज असल्याचे बोलले जातक आहे. पुण्यातील दौऱ्यात अजित पवार यांनी कार्यक्रम रद्द करत ते दिवसभर कोणाला भेटले नव्हते. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोलले जात होते. त्यातच ते भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा अंजली दमानिया यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाजपला भेगा पडलेल्या वज्रमुठीचा धोका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील असे म्हटलं होतं. त्यातच सत्ताधारी शिंदे गटाचे दादा भूसे यांनी देखिल ते अस्वस्थ असल्याचे सांगितल्याने एकच खळबळ उडाली आहे. अजित पवार यांच्याबाबत सध्या इतक्या चर्चा सुरू आहेत. मात्र त्यावर अजित पवार यांनी अजूनही मौन बाळगलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की काय चाललय असा सवाल आता लोकांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये पडला आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट