हातात टाळ, डोक्यावर टोपी; वारकरी वेशात विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन!

हातात टाळ, डोक्यावर टोपी; वारकरी वेशात विधानभवनाच्या पाऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन!

| Updated on: Jul 24, 2023 | 1:27 PM

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वारकरी लाठीचार्जचा मुद्दा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन केलं. वारकरी वेशात विरोधक आंदोलन केलं.

मुंबई, 24 जुलै 2023 | विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. आज अधिवेशनाचा सहावा दिवस आहे. या अधिवेशनादरम्यान विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या आंदोलनाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वारकरी लाठीचार्जचा मुद्दा घेत विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन केलं. वारकरी वेशात विरोधक आंदोलन केलं. डोक्यावर टोपी, हातात टाळ घेत विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वारकरऱ्यांवर लाठीचे वार करणाऱ्या सरकारचा धिक्कार अशा घोषणा देण्यात आल्या.

Published on: Jul 24, 2023 12:59 PM