जरांगेंची भाषा गुरमी अन् चॅलेंजची, वडेट्टीवार यांच्या टीकेवर जरांगेंचा एकेरी भाषेत पलटवार; तू नीट रहा…

| Updated on: Feb 23, 2024 | 6:04 PM

राहुल गांधींनी मराठ्यांच्या नादी लागायला सांगितलंय का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विजय विडेट्टीवार यांनी केला आहे. तर विजय विडेट्टीवार हे एका पक्षाचे विरोधी पक्षनेते आहे का? असा खोचक सवालही जरांगे पाटील यांनी विजय विडेट्टीवार यांना केलाय.

Follow us on

मुंबई, २३ फेब्रुवारी २०२४ : राहुल गांधींनी मराठ्यांच्या नादी लागायला सांगितलंय का? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विजय विडेट्टीवार यांनी केला आहे. तर विजय विडेट्टीवार हे एका पक्षाचे विरोधी पक्षनेते आहे का? असा खोचक सवालही जरांगे पाटील यांनी विजय विडेट्टीवार यांना केलाय. विरोधी पक्षनेते हे पद जनतेचं आहे घरचं नाही. तुमचं धोरण बघा…मराठा आंदोलनावर बोलू नका…राजकीय करिअर बरबाद करून टाकशील, जरा नीट रहा… असा एकेरी उल्लेख करत मनोज जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने मराठ्यांना जे आरक्षण दिलं आहे. त्यात त्यांनी समाधान मानावे, आणि आता समाजाला गृहित धरून वागू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या भाषेत गुरमी, चॅलेंजची भाषा आहे, त्यांनी ती करू नये. पुढे जरांगे पाटील यांचं हार्दिक पटेल झालेलं दिसेल, असे वक्तव्य काल विजय विडेट्टीवार यांनी केलं होतं. तर याच टीकेवर मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.