Special Report | “…तर गोळी झाडली असती” दीपक केसरकर यांच्या दाव्यावर विरोधकांची उपरोधिक टीका!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र त्याबद्दलचे खळबळजनक दावे कायम सुरुच आहेत. ठाकरे गटाने गद्दारांची वर्षपूर्ती म्हणत गद्दार दिन साजरा केला. पण ती गद्दारी नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही उठाव केला असं म्हणत शिंदे गटाकडून स्वाभिमानी दिवस साजरा करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा डोक्यावर गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला 1 वर्ष पूर्ण झालं. मात्र त्याबद्दलचे खळबळजनक दावे कायम सुरुच आहेत. ठाकरे गटाने गद्दारांची वर्षपूर्ती म्हणत गद्दार दिन साजरा केला. पण ती गद्दारी नव्हे महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आम्ही उठाव केला असं म्हणत शिंदे गटाकडून स्वाभिमानी दिवस साजरा करण्यात आला. मात्र शिवसेनेच्या आमदारांनी केलेला उठाव यशस्वी झाला नसता, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेव्हा डोक्यावर गोळी झाडून घेतली असती, असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केला. सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या पहिल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी हाच दावा केला होता. केसरकर यांच्या दाव्या नंतर आता विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना टार्गेट केलं आहे. ते काय म्हणाले यासाठी पाहा हा स्पेशल रिपोर्ट….