आवक जादा झाल्याने संत्र्यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
नागपूरच्या आंबट- गोड चवीच्या संत्र्यांना जगभरात मागणी आहे. या संत्र्यांची यंदा जादा आवक झाल्याने संत्र्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांना कमी लाभ होत आहे. मात्र ग्राहकांना स्वस्तात संत्री मिळत असल्याने त्यांचा फायदा झाला आहे.
नागपूर येथील संत्री जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र यंदा संत्र्याचे जादा उत्पन्न झाल्याने बाजारात आवक वाढून संत्र्यांचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे संत्री उत्पादक शेतकरी हिरमुसले आहेत. यंदा शेतकऱ्यांचे उत्पादन प्रचंड वाढले आहे. त्यामुळे शेतकरी एकीकडे आनंदात असताना दुसरीकडे त्यांना हवा तसा फायदा मिळत नसल्याने ते नाराजही झालेले आहेत. नागपूरची संत्री आंबट – गोड चवीमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. यंदा फळबागात संत्र्यांचे उत्पादन प्रचंड वाढले असून संत्री बाजारात जास्त आल्याने स्वस्त झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात संत्री मिळत आहेत. शेतकऱ्यांना हवा तसा लाभ मिळत नसला तरी उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने काही प्रमाणात फायदा होत आहे असे संत्र व्यावसायिकांनी म्हटले आहे.
Published on: Dec 29, 2024 05:03 PM
Latest Videos