संन्यासी माळा घालून शेकडो ओशो अनुयायांचा आश्रमात प्रवेश; पोलिसांकडून लाठीमार
काल ओशो आश्रमात अनुयायांना संन्याशी माला घालून जाण्याची मुभा क्षणिक ठरली. आज पुन्हा संन्याशी माला घालून प्रवेशास बंदी केल्यानंतर 150 ते 200 ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट उघडून आश्रमात प्रवेश केला. काहीही झाले, तरी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता संन्याशी माला घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला.
पुणे : ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या दबावाला बळी न पडता जबरदस्तीने गेट उघडून ओशो अनुयायांनी आज आश्रमात प्रवेश केला आहे. आश्रमात संन्याशी माळा घालून जाण्याची बंदी घालण्यात आली होती. आज पुन्हा संन्याशी माळा घालून प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. शेकडो ओशो अनुयायायांनी व्यवस्थापनाला न जुमानता गेट तोडून आश्रमात प्रवेश केला आहे. यावेळी आश्रमात प्रवेश शुल्क न भरता सन्याशी माळा घालून जाण्याचा निर्धार ओशो अनुयायांनी केला आहे. ओशो आश्रम व्यवस्थापनाच्या विरोधाला झुगारून लावत आश्रमात प्रवेश केलेल्या ओशो अनुयायांवर पोलिसांनी लाठीमार करत ताब्यात घेतलं आहे.
Published on: Mar 22, 2023 02:24 PM
Latest Videos