आमचं सरकार हे सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

| Updated on: Jul 10, 2022 | 3:18 PM

शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी हातमिळवणी करीत नवीन सरकार स्थापन केले. आज पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेसाठी (Vitthal Mahapuja) ते सहकुटुंब आले होते. महापूजेनंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद. दिल्लीवरून पटत असताना पुणे विमानतळावर हजारो लोकं अभिनंदनासाठी आणि  शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. त्यांची गर्दी पाहून आपला निर्णय हा सर्वसामान्यांच्या मनातला निर्णय असल्याच्या भावना […]

शिवसेनेशी बंडखोरी करून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी हातमिळवणी करीत नवीन सरकार स्थापन केले. आज पंढरपुरात विठ्ठलाच्या महापूजेसाठी (Vitthal Mahapuja) ते सहकुटुंब आले होते. महापूजेनंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांशी संवाद. दिल्लीवरून पटत असताना पुणे विमानतळावर हजारो लोकं अभिनंदनासाठी आणि  शुभेच्छा देण्यासाठी जमले होते. त्यांची गर्दी पाहून आपला निर्णय हा सर्वसामान्यांच्या मनातला निर्णय असल्याच्या भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या. राज्य ज्या गतीने चालले होते आणि गेल्या अडीच वर्षात काय काय झाले हे आपण सर्वांनी पहिले आहे. सरकार हे सर्वसामान्यांसाठी असते त्यामुळे राज्याला काय हवे नको ते पाहणे गरजेचं असल्याचेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारने बंद केलेली जलशिवार योजना पुन्हा सुरु केली असल्याचेही ते म्हणाले.

 

Published on: Jul 10, 2022 03:18 PM