‘आरएसएस आणि भाजप भारताच्या सुंदरतेला, परंपराना, विविधतेला नाही’; ओवैसी यांची घणाघाती टीका
त्यांनी समान नागरी कायदा हा आरएसएस आणि भाजपचा अजेंडा असल्याची टीका केली आहे. तर भाजप आणि आरएसएस भारताच्या सुंदरतेला, परंपराना, विविधतेला नाही मानत असा टोला देखील लगावला आहे. ते नांदेड येथे बोलत होते.
नांदेड : देशातील समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीकोणातून सध्या मोदी सरकार प्रयत्न करत आहे. त्यावरून सध्या देशाच्या अनेक भागात समंभ्रमावस्था आहे. यावरून एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह आरएसएसवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी समान नागरी कायदा हा आरएसएस आणि भाजपचा अजेंडा असल्याची टीका केली आहे. तर भाजप आणि आरएसएस भारताच्या सुंदरतेला, परंपराना, विविधतेला नाही मानत असा टोला देखील लगावला आहे. ते नांदेड येथे बोलत होते. संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये एकच बाब नाही तर दारूवर बंदी सांगितली आहे. देशाची संपत्ती सगळ्यांना मिळावी असे सांगितले आहे. पण 60 ते 70% संपत्ती 10 ते 20 लोकांकडेच आहे यावर ओवेसी यांनी प्रश्न उपस्थित केला. समान नागरिक कायद्यामुळे हिंदू मॅरेज ॲक्ट रद्द होईल त्यामुळे हिंदू पण परेशान होणार. नागालँड, मिझोरम राज्यांना आपण संवैधानिक हक्क दिलेत. त्यानुसार तेथील आदिवासींना समान नागरी कायदा लागू होणार नाही असे गृहमंत्री अमित शाह म्हणताहेत मग झारखंड, राजस्थान, तेलंगणा, आंध्र, ओडिसा मध्ये आदिवासी आहेत त्यांचे काय होणार असा सवाल ओवेसी यांनी केला आहे. भाजपला भारतीय मुस्लिमांची ओळख संपवायची आहे असाही घणाघात ओवैसी यांनी केला आहे