पॅलेस्टाईन की इस्रायल? शरद पवार यांचा कुणाला पाठींबा? मोदी यांच्याबाबत म्हणाले…
जगामध्ये शांतता हवी आहे. आज जगाच्या शांततेला धोका सुरू झाला आहे. जे कष्टकरी आज तिचे आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. ज्यांची जमीन, ज्यांचे घर दार त्यांच्या पाठीशी हा देश उभा राहिला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांची भूमिका..
मुंबई : 15 ऑक्टोबर 2023 | एक अतिशय गंभीर मुद्दा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मला सुचवायचं आहे की याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. जगामध्ये शांतता हवी आहे. आज जगाच्या शांततेला धोका आणि या भागात सुरू झालं. आज Israel हा लहानसा देश आहे. हा घटक आहे. मूळ, जमीन, घर, दार हे सगळं पॅलेस्टाईन लोकांचं होतं. तिथं अतिक्रमण झालं आणि Israel देश आला. त्याच्या आता खोलात जायचं नाही. पण, भाजप सरकारची भूमिका जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी या सगळ्यांची भूमिका ही होती की पॅलेस्टाईनला मदत करायची. हिंदुस्थानने कधीही दुसरी कुणाला मदत केली नाही. ज्यांची जमीन, ज्यांचे घर दार त्याच्या पाठीशी हा देश उभा राहिला. दुर्दैवानं पहिल्यांदा या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी Israel चे भूमिका घेतली आणि मूळ मालक जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. परराष्ट खात्यांनी जाहीर केलं की आपल्या देशाची भूमिका आणि या लोकांना समर्थन देणारी आहे. ही भूमिका अटल बिहारी वाजपेयींची होती आज त्या वाजून जातायत. उद्या त्यांना कुणी काहीही या प्रश्न विचारलं तर आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे.