पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली; नदीकाठच्या ग्रामस्थांचं स्थलांतर सुरु
जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने मध्यरात्री 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली आहे.
कोल्हापूर, 24 जुलै 2023 | जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे ओढे, नाले, ओहोळ, कालवे ओसंडून वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच धरणांमधील पाणीसाठ्यासह नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने मध्यरात्री 39 फुटांची इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, प्रयाग चिखली व आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे. राधानगरी धरण 85 टक्के भरले असून, सध्या 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Published on: Jul 24, 2023 10:56 AM
Latest Videos