“शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गद्दार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलं जाईल”
Uddhav Thackeray : शिवसेना पक्ष, इतिहास आणि गद्दारी ; उद्धव ठाकरेंवर कुणाचा घणाघात? पाहा सविस्तर व्हीडिओ...
पंढरपूर : माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा गद्दार म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव लिहिलं जाईल, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. गद्दार उद्धव ठाकरे आहेत. मुख्यमंत्री बनण्यासाठी राष्ट्रवादीकडून किती खोके घेतले याची चौकशी करावी लागेल, असंही रामदास कदम म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरण खातं काका म्हणून माझ्याकडून समजून घेतलं. नंतर काका आऊट साहेब इन!, असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
Published on: Apr 04, 2023 02:49 PM
Latest Videos