शहाजीबापू पाटील यांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; पाहा व्हीडिओ...

शहाजीबापू पाटील यांचे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप; पाहा व्हीडिओ…

| Updated on: Apr 13, 2023 | 10:09 AM

Pandharpur News : 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीवरून शहाजीबापू पाटील यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले आहेत पाहा व्हीडिओ...

पंढरपूर : शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शरद पवारसाहेबांनी विधानसभा निवडणुकीवेळी माझं तिकीट कापण्याचा मोठा प्रयत्न केला. महाविकास आघाडी असती तर उद्धव ठाकरेसाहेबांनी पवार साहेबांच्या सांगण्यावरून विधानसभेला मला थांबवलं असतं. म्हणून मी गुवाहाटीला गेलो, असं शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत. शिवसेनेचे 40 मतदारसंघ धोक्यात होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या मतदारसंघातील त्यांच्या पराभूत उमेदवारांना बळ देत होते, असंही शहाजीबापू म्हणाले आहेत. सांगोला तालुका मला विकासाच्या बाबतीत बारामतीला नेऊन भिडवायचा आहे. त्यासाठी मी प्रयत्न करतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Apr 13, 2023 10:09 AM