Sugar Factory Income Tax Raid | पंढरपूरमधील साखर कारखानदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा - tv9

Sugar Factory Income Tax Raid | पंढरपूरमधील साखर कारखानदाराच्या घरावर आयकर विभागाचा छापा – tv9

| Updated on: Aug 26, 2022 | 2:41 PM

साखर सम्राट अभिजीत पाटील यांच्या घराची आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. तसेच सोलापूरसह पंढरपूरमधील वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या घरांवर देखील आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे.

पंढरपूरमधील साखर सम्राट कारखानदार अभिजीत पाटील यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला आहे. यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. तर साखर सम्राट अभिजीत पाटील यांच्या घराची आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. तसेच सोलापूरसह पंढरपूरमधील वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या घरांवर देखील आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे. साखर सम्राट अभिजीत पाटील यांच्या जवळ चार खासगी साखर कारखाने आहेत. सध्या आयकर विभागाकडून त्यांचे घर कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे. आयकर विभागाकडून काल साडेसहा वाजता छापा टाकण्यात आला होता. तर जवळपास 30 तासांपेक्षा अधिक काळ झाला तरी छापामारी सुरू असून सर्व कागदपत्रांची चौकशी सुरू असल्याचे समोर येत आहे.

Published on: Aug 26, 2022 02:41 PM