Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेलाही गर्दी झाली नव्हती; शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य

पंढरपूरच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेलाही गर्दी झाली नव्हती; शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य

| Updated on: Mar 29, 2023 | 8:20 AM

Balasaheb Thackeray Sabha : बाळासाहेब ठाकरे यांची सभा अन् गर्दी... शिवसेनेच्या मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. पाहा व्हीडिओ...

पंढरपूर : “पंढरपूरच्या मैदानात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेलाही गर्दी झाली नव्हती. पण, सावंत बंधू यांनी केलेल्या नियोजनामुळे आपण 7 लाखांची गर्दी उद्धवसाहेबांच्या पंढरपूर इथल्या शिवसेनेच्या मेळाव्यात केली होती”, असं शिवसेनेचे नेते, राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. पंढरपूरच्या मैदानात अटलबिहारी वाजपेयीं , अडवाणी , नरेंद्र मोदी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांना मैदान भरलं नाही. पण ते मैदान सावंत बंधूनी काम करून भरून दाखवलं. सेनेच्या मेळाव्यात आमच्यामुळेच गर्दी व्हायची, असं म्हणत तानाजी सावंत यांनी स्वकौतुक करताना थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेशी तुलना केली. दरम्यान, मंत्री सावंत यांनी ज्या 7 लाखाच्या सभेचा उल्लेख केला ती सभा आयोध्या दौऱ्यानंतर पंढरपूरमध्ये उद्धव ठाकरे यांची झाली होती.