'माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही', पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

‘माझ्या पराभवानंतर 2 डझन आमदार-खासदार झाले, पण मी पात्र नाही’, पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

| Updated on: Jun 04, 2023 | 9:35 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच दिल्लीत केलेल्या भाषणावरून त्या चर्चेत आल्या आहेत. त्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी गोपीनाथ गडावर जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी रोखठोक भूमिका मांडली.

बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नुकतंच दिल्लीत केलेल्या भाषणावरून त्या चर्चेत आल्या आहेत. त्यानंतर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी गोपीनाथ गडावर जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. पंकजा मुंडे यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर राज्यात विधान परिषद, राज्यसभेच्या खासदारकीच्या निवडणुका पार पडल्या. पण त्यामध्ये पंकजा यांना संधी मिळाली नाही. विशेष म्हणजे प्रत्येक निवडणुकीवेळी पंकजा यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. अखेर पंकजा यांनी यावर भाष्य केलं आहे. “पंकजा मुंडे राजकारणात जी भूमिका घेईल ती छातीठोकपणे घेईल. आज 3 जून 2023 पर्यंत ज्या भूमिका मांडल्या आहेत त्या भूमिकांशी मी प्रामाणिक आहे. लोकांमध्ये, माध्यांमध्ये, विरोधकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची संधी मी दिलेली नाही. अनेक लोकं निवडणुका हरले, पण त्यांना संधी दिली गेली. गेल्या 4 वर्षात कदाचित 2 डझन आमदार-खासदार झाले, त्यामध्ये मी पात्र बसत नसेल तर लोकं चर्चा करणार. ही चर्चा मी ओढवलेली नाही. कारण माझ्या मनात दाट विश्वास आहे”, असं पंकजा म्हणाल्या.

 

Published on: Jun 04, 2023 09:35 AM