लोकसभा लढणार की नाही? भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

| Updated on: Feb 29, 2024 | 4:30 PM

बीडमधून लोकसभेच्या रिंगणात पंकजा मुंडे यांना उरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणूक लढणार की नाही? याची पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पकंजा मुंडे म्हणाल्या...भाजपचे सर्व निर्णय हे दिल्लीत हो असतात.

Follow us on

मुंबई, २९ फेब्रुवारी २०२४ : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उरवण्याची भाजपची तयारी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. लोकसभा निवडणूक लढणार की नाही? याची पहिली प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पकंजा मुंडे म्हणाल्या…भाजपचे सर्व निर्णय हे दिल्लीत हो असतात. माझ्या नावाची चर्चा प्रत्येक निवडणुकीत होत असते, असे म्हणत त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रश्नावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रीतम मुंडे लोकसभेच्या १० वर्ष खासदार आहेत. एनसीपी सोबत युती झाल्याने मतदारसंघात प्रश्न निर्माण झाला आहे. ‘मी राज्यातच नव्हे देशात स्टार प्रचारक राहिलेले आहे. त्यामुळे माझ्या लोकसभेच्या उमेदवार कोणी असो स्टार प्रचारक आणि सर्व जबाबदारी माझी असेल’, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तर भविष्यात राष्ट्रवादीची युती असेल त्यांचे स्टार प्रचारक कोण असेल ते त्यांचे ठरवतील, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.