Special Report | पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेणार? मनात नेमकी खदखद काय?

| Updated on: Jun 02, 2023 | 7:35 AM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा बाहेर आली आहे. मी पक्षाची आहे, पण पक्ष माझा नाही, असं जाहिर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून एक प्रकारे भाजपला इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मनातील खदखद पुन्हा बाहेर आली आहे. मी पक्षाची आहे, पण पक्ष माझा नाही, असं जाहिर वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून एक प्रकारे भाजपला इशाराच दिल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा नाराज असल्याच्या चर्चा अनेकवेळा समोर आल्या आहेत. पंकजा यांच्या नाराजीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना अनेक वेळा ऑफर दिली आहे, ठाकरे गटाने तर पंकजाने निर्णय घ्यावा असं जाहिरपणे सांगितलं आहे. तर भाजपने पंकजा यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं म्हटलं आहे. पण काही दिवसांपासून पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यामधली जवळीक वाढू लागली आहे, त्यामुळे पंकजा मुंडे पक्ष बदलणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजप खासदार प्रितम मुंडे यांनी देखील कुस्तीपटू यांच्या आंदोलनावरून भाजपचे कान
टोचले आहेत, त्यामुळे मुंडे बहिणींच्या मनात नेमकं काय चालू आहे, पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील का? यासाठी पाहा त्यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

Published on: Jun 02, 2023 07:35 AM