निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा, आमदारकीबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य

निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा, आमदारकीबाबत पंकजा मुंडेंचं वक्तव्य

| Updated on: May 28, 2022 | 10:03 AM

निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. विधान परिषदेसाठी अनेकांच्या नावाची चर्चा आहे. त्यात माझं नाव देखील असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यावेळी तरी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेतून आमदारकीची संधी मिळणार का? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. याबाबत बोलताना पंकजा मुंडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते. विधान परिषदेसाठी अनेक नावांची चर्चा आहे. त्यात माझं देखील नाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल असं देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

 

 

Published on: May 28, 2022 10:03 AM