Special Report | ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाचा झटका-tv9

| Updated on: Mar 24, 2022 | 9:21 PM

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिलाय. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयनं महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिलाय. परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंहांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेप्रमाणे त्यांना कारवाईपासून संरक्षणही मिळालं होतं. त्याचबरोबर त्यांनी आपल्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणीही सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आता सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व प्रकरणांचा तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारकडून सिंह यांच्यावर दाखल गुन्ह्यांचा तपास मुंबई पोलीस आणि सीआयडीकडून सुरु होता. मात्र, आता महाराष्ट्र सरकारला हा मोठा झटका म्हणावा लागेल. कारण, या सर्व प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे वर्ग करण्यात येईल. त्यामुळे सीबीआयकडून या सर्व प्रकरणांचा तपास कसा केला जातो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Special Report | Devendra Fadnavis यांचा विधानसभेत तिसरा पेनड्राईव्ह बॉम्ब-tv9
Special Report | Pravin Darekar यांना Ajit Pawar यांचा टोला-tv9