हेही नको आणि तेही नको, एक नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्तीत स्वतंत्र भारत पक्ष सहभागी
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूकाची बिगुल वाजणार आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्षांचे शकले पडली आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती यांच्या प्रमुख लढत होणार आहे. यात आता तिसरा पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडी देखील उभी राहत आहे.
महाराष्ट्रात येत्या काही महिन्यात विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणूकांत आठ पक्षांचा मिळून तिसरा पर्याय समोर आला आहे. परिवर्तन महाशक्ती नावाने स्थापन झालेल्या आघाडीत स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप सहभागी झाले आहेत. संभाजीनगरातील संत एकनाथ सभागृहात या सर्वसमविचारी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा ठेवला असल्याचे वामनराव चटप यांनी सांगितले. ज्यांना ज्यांना परिवर्तन व्हावेसे वाटतंय त्यांनी या परिवर्तन महाशक्ती आघाडी बरोबर यावे, त्यांचे स्वागत असल्याचे चटप यावेळी म्हणाले आहेत. गावातील माणूस, उपेक्षित दलित माणूस यांच्या परिवर्तन करायचे आहे. अडीच – अडीच वर्षांची दोन्ही सरकारं पाहीली 91 आमदार खरेदी – विक्री होताना पाहीले त्यामुळे स्थिर सरकार द्यायचे असेल तर हेही नको आणि तेही नको एक विचार घेऊन आम्ही निवडणूका समोरे जात असल्याचे शेतकरी नेते वामनराव चटप यांनी म्हटले आहे.