उद्धवसाहेब, तुम्ही म्हणता रडायचं नाही लढायचं, पण कसं?; शिवसैनिक ढसाढसा रडला

उद्धवसाहेब, तुम्ही म्हणता रडायचं नाही लढायचं, पण कसं?; शिवसैनिक ढसाढसा रडला

| Updated on: Feb 19, 2023 | 12:08 PM

परभणीतील एका शिवसैनिकाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात हा शिवसैनिक ढसाढसा रडताना दिसत आहे. पाहा व्हीडिओ...

परभणी : केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना पक्षाच्या नावाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल यांच्या बाजूने दिला.या निर्णयानंतर राज्यभरात ठाकरे गटाकडून आंदोलन केली जात आहे. निकालानंतर परभणीतील एका शिवसैनिकाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये या शिवसैनिकाला अश्रू अनावर झाले. बाळासाहेब घात झाला हो… असं म्हणत हा शिवसैनिक रडतोय. विजय खिस्ते पाटील असं या शिवसैनिकाचं नाव आहे. यापूर्वीही खिस्ते पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी आपल्या रक्ताने पत्र लिहिलं होता. खिस्ते पाटील यांचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published on: Feb 19, 2023 12:07 PM